हुरहुर
हुरहुर
1 min
318
शाळेतील शिक्षिका आहे हो मी
माझ्या लहान मुलांची आई
प्रत्येकाला जीव लावते मी
त्यांच्या अंतरात मी जाई.....
सतत हहूरहूर मनाला माझ्या
क,ख,ग,घ येईल का मुलांना
कसे शिकवू बर या लहानग्यांना
शैक्षणिक साहित्य बनवून शिकवते बाळांना.....
बाळे माझी आहेत खूपच हुशार
करतात अभ्यास छान मन लावून
शाळेतील उपक्रमांना साथ देतात
त्यातच जातात भान हरपून....
वाचनाचा प्रयत्न करतात आता ती
श्रूतलेखन करताना आनंदानं खुलतात
अभिमान आहे माझ्या मुलांचा मला
सदैव मुले माझी गर्क लेखन,वाचनात .....
