हसताना
हसताना
1 min
211
हसताना
तुझ्या गुहेत मी आले नकळत
दुःख तुला झाले माझा अवतार बघुन
सांगु कसे तुला मी कसा झाला माझा हा अवतार
न सांगताच तुला सर्व काही कळले आणि खट्टु झाले तुझे मन
तुझ्या सवे ह्या गुहेत आनंदी मी आहे
नसुन एकही आंगावर वस्त्र
नाही वाटत लाज असे तुझ्या सवे बसताना
तु मला बघावे हसताना ...आणि फक्त हसताना
तु पण हस माझ्या संगे
नकोस होऊ दुःखी
तु दिलेल्या आसर्याने
मी आहे आनंदी अन् सुरक्षित तुझ्या सवे ह्या गुहेत!!
