STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

हसरी सकाळ

हसरी सकाळ

1 min
362

कोरोना विषाणूने हो केलाय घात

सर्वच बसलेय आपल्या घराच्या आत..


सकाळ, दुपार, रात्र सर्वच भासे एक

बातम्यातील काही बातम्या असतात फेक...


लहान मुले जेरबंद झाली हो घरात

साधं खेळताही येईना आपल्याच अंगणात...


मोठी माणसं घरूनच काम करतात

एकमेकांवर शब्दांनेच मनसोक्त बरसतात...


आता लाॅकडाउनची सवय झाली सर्वांना

मदत करू लागले ह आता एकमेकांना...


कोरोनाने कोणाला कधीही देवाज्ञा होईल

याची धास्ती मात्र मनी सततची राहील...


नातेवाईक,मित्रांची होते फोनवर चौकशी साधी

खरचच येणार सर्वजण एकत्र हो कधी...


कधी उगवेल हो परत हसरी सकाळ

जेव्हा आसमंती विरून जाईल कोरोना काळ...


Rate this content
Log in