STORYMIRROR

Bharati Sawant

Others

4  

Bharati Sawant

Others

हसरी पहाट

हसरी पहाट

1 min
228

उठा उठा हो सकलजन 

उगवलीय हसरी पहाट 

गावकुसाबाहेर कुईकुई

वाजतो आडाचा रहाट


शाल धुक्याची पांघरून

पहाट‌ झालीय मोकळी

दवबिंदुंच्या या शिंपणाने

उमलताच हसली कळी


फेकू निशेची काळी दुलई

संपते बिछान्यात वळवळ

सडा प्राजक्ताचा अंगणात

सुटलाय मंदधुंदसा दरवळ


चमकुनी शुक्राची चांदणी 

जाता खट्याळ हसे गाली

रवीराजाच्या आगमनानेच

पसरली नभी सुवर्ण लाली 


राऊळातला गोड घंटानाद 

प्रभाती मंजुळ काकडारती 

भास्कर डौलाने येता नभी

पक्षीगणही मुक्त विहरती 


पाखरांची किलबिल शीळ 

कानावर पडे मंजूळ गाणी 

करी चिमणचाऱ्याची घाई 

ऐकूया भूपाळीचीच वाणी


Rate this content
Log in