हसरी मूर्ती
हसरी मूर्ती
1 min
232
नात जन्मली
घर हर्षले
नामकरण
आनंदे केले....
त्रिशिका नाव
आई बाबांचे
अती लाडाचे
होय मोदाचे....
झाली मासाची
तनू भरली
गोरी जाहली
खेळू लागली....
पायात वाळे
हाती माटल्या
दोन बहिणी
मस्त रमल्या.....
त्रिशिका झाली
दोन मासाची
माय दमली
बाजी मुलींची....
पाहून तिची
हसरी मूर्ती
होईन तिची
महान किर्ती....
मुलींचा हशा
खूश आजोबा
आजी खेळते
दमतो बाबा....
