STORYMIRROR

Shanti Gurav

Others

3  

Shanti Gurav

Others

हसरे क्षण

हसरे क्षण

1 min
124

हसवायला पुरेसे असतात काही हसरे क्षण

नवीन उमेद जागवतात असे हे सुंदर क्षण.

     सर्वांना हवेहवेसे वाटतात असे हे क्षण

     जणू काही असतात हे सुवर्णक्षण.

जीवनाला उभारी देतात हे क्षण

दुःखावर शीतल शिडकावा करतात हे शांत क्षण.

      भारावलेले असतात काही क्षण

      आठवणींचे गाठोडेच असतात हे दुर्मिळ क्षण.

जीवनाच्या खडतर मार्गावर सोबत करतात हे क्षण

खाचखळग्यांनाही कोमल ,सुखकर करतात हे मखमली क्षण.

       डोळ्यांच्या पापण्यांत लपलेले हे अश्रूमय क्षण 

       ओठांच्या शिंपल्यात अलगद झेलतात हसरे क्षण.

खोल मनाच्या गाभाऱ्यात बसलेले असे हे क्षण

भावनांच्या पसाऱ्यात ही सापडतात हे एकल क्षण.

        आठवणीच्या कप्प्यात साठून राहतात हे क्षण

        मनाला ऊर्जा देतात हे ऊर्जित क्षण.

जीवनात असतात असे बहुरंगी क्षण

जगण्याला गुलाबी झालरच लावतात हे हसरे क्षण.


સામગ્રીને રેટ આપો
લોગિન