हसरा पाऊस
हसरा पाऊस
1 min
208
हसरा नाचरा पाऊस आला
झाडा फुलांनी बहरून गेला।
शाल हिरवी पांघरलेली
हिरव्या पानांची तोरणे सजलेली।
कोकीळ गाई कुहू कुहू गाणी
मोर नाचे पिसारा फुलोनि।
शेतकऱ्यांची दिसे लगबग
पावश्याची ती पाण्यासाठी तगमग।
दवबिंदू हे दिसती मोतीसमान
नभात सुंदर इंद्रधनुष्य कमान।
सात रंग हे इंद्रधनुचे
उन्हात पाऊस सुंदर दिसे।
पक्षांची ती किलबिल
पावसाचा आनंद घेतात ती देखील।
अशी ही निसर्गाची किमया
पावसाच्या नयनरम्य श्रावणधारा।
