हरवली पुस्तके
हरवली पुस्तके
*पूर्वी वाचनालयात जायचे*
*हवी ती पुस्तके रजिस्टर नोंद करायचे*
*वाचनालयात असतील तर घेवून यायचे*
*नसतील पुस्तकाचे नाव नोंदवायचे*.....
*दोन दिवसांनी परत फिरत जायचे*
*आलेले पुस्तक घरी आणायचे*
*आठवडाभर मस्त निवांत वाचायचे*
*मला त्यातील संक्षिप्त नोंदी काढणे आवडायचे*.....
*पुस्तक व मी दिनभर रमायचो*
*आवडच तशी होती मला वाचनाची*
*कथा,कादंबर्यांचे मन लावून वाचन करायचे*
*धूंदी चढायची मला त्या शब्दांची,वाक्यांची*...
*आता हे सारे संपुष्टात आले बरे*
*वाचनालये आहेत पण तिथे वाचक नाही*
*तंत्रज्ञानाची झालीय खूप अहो गर्दी*
*सदा वाचक नेटवर पुस्तके शोधत राही*.....
*हरवली पुस्तके या तंत्रज्ञानी युगात*
**मानवाला वेळ नाही वाचनालयात जायला*
*हवे ते मिळतेय वाचायला नेटवर*
*इतका दमतो मानव वेळ नाही त्याला पोटभर खायला.....*
