हरवलेलं बालपण
हरवलेलं बालपण
पुन्हा लहान व्हावंसं वाटतय
ते हरवलेलं बालपण
पुन्हा फिरून यावंसं वाटतंय
आठवतंय ते बालपण
आणि ते गोड क्षण
आठवले तरी अगदी
भरून येते मन
आठवते ती शाळा
जिथे तुटकाच होता फळा
पण तरी देखील शिकण्याचा
लागला होता लळा
आठवते ती पाटी
जीथे शब्दाची झालेली असायची दाटी
पण तरी ही लिहिण्याची गंम्मत होती न्यारी
अन काही झालं तरी ती फुटकी पाटीच होती प्यारी
आठवतेय ती शाळेतली प्रार्थना आणि प्रतिज्ञा
जिने शिकवली होती शिरसावंद्य गुरु आज्ञा
आठवतायत ते बे दुणे चे पाढे
आणि ते बालभारती चे धडे
त्यातूनच सोडवले आयुष्याचे खरे कोडे
आठवतोय तो खेळाचा तास
जिथे मित्र मैत्रिणी जमायचे खास
त्यातच हरवायच कुणाच्या तरी
मामाच पत्र, तर कुणाचा लपंडाव
अश्यातच घंटा होताच नुसतीच धावाधाव
किती रम्य आणि गोड होत
खरंच ते बालपण
जिथे नव्हती कसली चिंता की
नव्हतं कसलंच दडपण
निखळ निळ्या समुद्रासारखं
वाहत फक्त जायचं
निळ्याशार गगनाकडे
तासनतास पाहत राहायचं
अबोध अश्या मनात नव्हता
कुणाचाच द्वेष की नव्हती ती ईर्षा
कितीही झालं भांडण तरी
एकत्र येण्याची असायची मनी आशा!!!
