हरवलेलं बालपण
हरवलेलं बालपण
रात्री आली माझ्या
स्वप्नात माझी शाळा
शिकवत होत्या बाई
गच्च भरला होता फळा।
दुसरा तास होता गणिताचा
डोक्यावरून चालल होत सगळं।
आकडे नाचताना दिसत होती
बाईंनी विचारलं काहीतरी वेगळं।
आईच्या हातचा डबा
काय सांगू त्याला चव अमृताची ।
काहीही असलं डब्यात तरी
पोटभर सगळे जेवायची।
झाले तास संपले सगळे
मैत्रिणी झालो गोळा एकसाथ।
बोर, चिंचा पडायचा रोज
आम्हाला लागला होता नाद ।
पावसाळ्यात तर कसली छत्री
अन कसलं काय ।
चिखल उडवत चालयचो
मग दुखायचे पाय ।
कागदाची नाव करून
तिला ठेवायची पाण्यात ।
तिच्यासोबत चालत जायचे
लांबवर स्वप्नांच्या दुनियेत ।
कडाडली वीज अन मग
मला आली आवाजाने जाग
स्वप्न सगळे संपले होते मात्र
बालपण मी अनुभवलं आज।