STORYMIRROR

Aruna Garje

Others

2  

Aruna Garje

Others

हरवलेले बालपण...

हरवलेले बालपण...

1 min
75

शोधू कुठे हे कळेना 

बालपण सरलेले 

इच्छा माझी नसताना 

वय माझे वाढलेले


किती जरी ठरवले

बालपण जगायचे

रिमझिम पावसात

चिंब चिंब भिजायचे


कागदाची छोटी होडी

पाण्यामध्ये सोडायची

हळूहळू चालताना

कौतुकाने पाहायची


कैरी जी आंबटगोड 

हलकेच तोडायची 

छोट्या छोट्या मित्रांमध्ये 

मजा वाटून खायची


लपाछपी दोरीउडी

धप्पाकुट्टी नि लगोरी 

बालपणी सारे खेळ

कित्ती कित्ती होते भारी 


धिंगामस्ती केली तर

रागावत बाबा आई

भोंगा तो पसरतात 

कुशीमध्ये तीच घेई


क्षण ते हरवलेले 

बालपण आठवणी

आठवू या पुन्हा पुन्हा 

आठवणीतील गाणी


Rate this content
Log in