STORYMIRROR

सचिन विश्राम कांबळे

Children Stories Others Children

2  

सचिन विश्राम कांबळे

Children Stories Others Children

हरवले बालपण

हरवले बालपण

1 min
83

प्रश्नोत्तरांचा हा खेळ

आमचा बसत नाही ओ मेळ,

उत्तरे ती लिहून लिहून

डोक्याची होते ना ओ भेळ..!!

किती बरे झाले असते

नसती जर का ही परीक्षा,

नसती मिळाली आम्हा

ही प्रश्नोत्तरांची शिक्षा..!!

काना-मात्रा, आकार-उकार

सारं हे डोक्यावरून ओ जातं,

नसती जर का हीआकडेवारी

तर गणित सोडवणं झालंच नसतं..!!

अजून आहोत सरे लहान आम्ही

खेळणे कुठे आम्हाला मिळते,

अभ्यासाच्या या टेन्शनपायी

बालपण आमचे हरवून जाते...!!


Rate this content
Log in