*हरताळ.....*
*हरताळ.....*
1 min
367
आपल्याच मुलांसाठी एक हरताळ
करून पाहावा हो पालकांनी
आपल्या मुलांना नियमित शाळेत
परिपाठाला हजर ठेवीन हा पण करूनी....
परिपाठातील प्रार्थना मुलांना
पाठ करायला लावण्यासाठी
नियमित मुलांना शाळेत पाठवावे
दैनंदिन अध्यापनासाठी.....
उपक्रम ,प्रकल्प अन ज्ञानसंपादन
आपोआप तयार होईल मुलांचे
मुलांना तयार करून शाळेत पाठवण्याचे
काम फक्त राहिल मग या पालकांचे....
पालकांनी करूनी एकजूट हरताळ केला
मुलांसाठी शिक्षकांच्या संगतीने
भारताला उत्तम नागरिक मिळेल
शाळेतील सर्व शिक्षकांच्या मदतीने.....
