हरिहर भेट
हरिहर भेट
उंचउंच दीपमाळ लावू
हरिहर भेट नेत्रांनी पाहू
काळ्याभोर नभाने घातला चांदण्यांचा हार
वाटोळ्या चंद्राने पेलला जणू हाराचा भार
लखलख करणार्या चांदण्यांचा प्रकाश
चांदीच्या वर्खाने सजले आकाश
नयनरम्य हे क्षण, हरिहराची भेट
चौरंगावर पूजा मांडली थेट
दिवा तरंगता तेवत, प्रतिबिंब पाण्यात
किती सुमन उधळू भजन गाण्यात
विष्णूला सहस्त्रदल तुळस, शिवाला लक्ष बेल
महानैवेद्य पंजरी, दहीभात केलं
श्वासाचा अखंड धूप, देवा तू मनाच्या गाभार्यात
अनुभव हा स्वर्गसुखाचा लाखमोलाचा आशिर्वाद हरिहराचा
दिव्यांच्या प्रकाशात नदी, सागर गेले न्हाऊन
कायम शरण देवा तुला स्वत:हून
