STORYMIRROR

SURYAKANT MAJALKAR

Others

4  

SURYAKANT MAJALKAR

Others

हृदयी साईं

हृदयी साईं

1 min
247

श्रध्दा न सबुरी

साईंच्या दरबारी

करी ईच्छा पुरी

भक्तांची साईं ।। ॐ॥


साईंचा दरबार

भक्तांचा आधार

करीतो स्विकार

प्रेमळ श्रध्दा ।।


दलित श्रीमंत

जशी असे ऐपत

असावी दानत

भक्ताठायी।।


पांघरती शाल

असो हार विशाल

असे गुलाब एखादं

साईंस पावत ।।


जुनी ती मस्जिद

झाली व्दारकामाई

अब्दुला जवळ घेई

म्हाळसांसंगे ।।


नव्हे अंधश्रध्दावंत

नव्हे अतिश्रध्दावत

लावी आपले अर्थ

पेटत्या पणतीचे ।।


हिंदूस 'अल्ला मालिक'

मुसमानास 'भगवान भला करेगा'

व्हावे निश्चिंत, 

सांगती भक्तांस ।।


बृहद चरित्र साईंचे

त्याहुनी मोठा साईं

शिकवी मानवताही

जीवनी अपुल्या ।।


वृत्तीने फकीर

अल्लाचा बंदा

की रामाचा अवतार

स्वयं ठरवी भक्ता ।।


हृदयी साईं

जशी जननी-आई

कधी कठोर, कधी प्रेमळ

असे भक्तापायी ।।


लेखणी पावन

दासगुणजी नमन

मी कणासमान

'सुर्यांश' वर्णितो. ।।



Rate this content
Log in