STORYMIRROR

Prashant Shinde

Others

2  

Prashant Shinde

Others

हर हर महादेव!

हर हर महादेव!

1 min
525

हर हर शंभो।शंभो महादेवा।

किती करू देवा ।तुझा हेवा।।धृ।।

कैरास राणा तू। शिव चन्द्र मोळी।

गाली तुझ्या खळी।अलौकिक।।

रूप तुझे देवा।वर्णिले सुखाने।

देवा प्रत्येकाने।मनोभावे।।

त्यात काय भर।मी रे घालणार।

भोळाच पामर।मी रे देवा।।

काय जे मनात। तेच अंतरात।

दुजे काही नाही।उदरात।।

तूच दाता त्राता।माझ्या रे जीवाचा।

मुखी रे शिवाचा।जयघोष।।

जाणतोस नारे।सारेच की तूच।

तुझाच रे मीच।भक्त एक।।

करी रे उद्धार।जवळी घेऊन।

आशिष देऊन।झडकरी।

नाम तुझे गोड।सदैव मुखात।

सदा हृदयात।राहू दे रे।।


Rate this content
Log in