होता आगमन बाप्पाचे
होता आगमन बाप्पाचे
1 min
232
होता आगमन बाप्पाचे
आनंद होई घराघरांत
गणपती बाप्पा मोरया
नारा घुमतो दाहीदिशात
होता आगमन बाप्पाचे
लहान मुले नाचती गाती
मिष्टान्न मोदक नैवेद्याचा
गंध दरवळे अवतीभवती
होता आगमन बाप्पाचे
चैतन्य पसरे गावागावांत
वाजतगाजत येई गणराया
आनंद होई मनामनात
होता आगमन बाप्पाचे
संकट सारे दूर पळती
सुखकर्ता नि दुःखहर्ता तो
चला करू त्याची आरती
