STORYMIRROR

गोविंद ठोंबरे

Others

4  

गोविंद ठोंबरे

Others

होम क्वारन्टाईन

होम क्वारन्टाईन

1 min
427

असाही मी होम क्वारन्टाईनच होतो कित्येक वर्षांपासून....!

बरेच वर्ष माझ्याच गावात हुंदडलो नाही... बांधावर फिरकलो नाही

गाव अन् गावातल्या माणसांन बोललोही नाही!

मी होतो क्वारन्टाईन माझ्याच विश्वात...


बाप अन् माय सोडून स्वतःच्या कमावलेल्या घरात

माझंच जित्राब घेऊन तिऱ्हाईताच्या गावात

मी माझ्याच आयुष्याला माझ्याच हाताने लावून घेतला होता कर्फ्यू

फक्त नोटा कमवायला निघायचो घराबाहेर..


त्यावेळी माय बोलवायची बापाखातीर

बाप बोलवायचा मायखातीर...

मला मात्र जमलं नाही गावाकडे जायला

त्यांच्याच कन्फ्युजनमुळे दोघांच्याही खातीर...!


कारण मी माझा नियम, मोडला नाही..

हद्दीच्या बाहेर, गेलोही नाही..

मला कोणी सांगायची गरज, पडलीही नाही!


आता मात्र गावाकडे फिरकलोय

न सांगता एक भयंकर सरप्राईज घेऊन

माझ्याच माय बापासाठी,

कर्फ्यू अन् होम क्वारनटाईन!

सर्व नियम व अटी फाट्यावर मारून...


Rate this content
Log in