STORYMIRROR

Deepa Vankudre

Others

3  

Deepa Vankudre

Others

होळी

होळी

1 min
259

षड्रिपूंची समिधा जाळूया, 

सुविचारांची पुरणपोळी,

प्रेमाच्या रंगांची धुळवड, 

कुविचारांची करूया होळी!


फाल्गुनात रंगांचा उत्सव,

नैराश्याची मोळी बांधूया,

आयुष्यात खुलवूया रंग,  

सकार भावना सांधूया!


Rate this content
Log in