हो स्वच्छंद फुलपाखरू
हो स्वच्छंद फुलपाखरू


धनसंपदेचा हिशोब
खूप केला आजवर
जुळला न ताळेबंद
पळायचे तरी कुठवर
आयुष्याची शिल्लक
न मोजली क्षणभर
विचार केला नाही
जगायचे कधी मनभर
मौल्यवान श्वासांचे
सांगणे आहे कणभर
जगून बघ आयुष्य
थांबव आता मरमर
नव्या जोमाने उठून
झाले गेले सारे विसर
नवचैतन्यात न्हाऊ दे
स्मृतींच्या वाटा धुसर
हो स्वच्छंद फुलपाखरू
उडणे नकोच वरवर
विवंचनांना पुरून
विश्वास ठेव स्वत:वर
वाकुल्या दाखवून
काळ होतोय फरार
प्रत्येक क्षणांशी तुझा
हवा आनंदाचा करार
शिल्लक हीच गुंतवून
समाधानाच्या व्याजावर
बांधू महाल सुखाचा
हृदयाच्या निर्मळ धरतीवर