STORYMIRROR

Sayli Kamble

Others

4  

Sayli Kamble

Others

हळवी सांज

हळवी सांज

1 min
556

खेळ खेळताना डाव येईल माझ्यावर

ह्या प्रतिक्षेत कोवळे हरवले माझे स्वर


गुंतविता मिठीत साठविले लाघवी क्षण

कधी प्रपंचात विसावले ते भान हरपून


आता कुठे जराशी जाग मला आली

पहाता सभोवार आयुष्याची सांज ही झाली


ह्या पल्याडही आहे जिणे पडला विसर मनास

झाकलेल्या मुठी रित्याच हाच जीवनाचा प्रवास


देहानेही अनुभवली किती रूपे विविध

आसवांना पापण्यांनी केले काहिसे कैद


अंधारा आधीचे रंगीत झालेले आकाश

माझा रंग शोधण्या जरा झालाच अवकाश


खिळून गेली आज नजर क्षितिजावर

साद घातल्याचा पल्याड सूर येतो कानावर


Rate this content
Log in