STORYMIRROR

Sneha Kale

Others

3  

Sneha Kale

Others

हल्ली मी किचनमध्ये असते

हल्ली मी किचनमध्ये असते

1 min
177

अंग कितीही दुखत असले

तरी मी जेवण बनवत असते

हल्ली मी किचनमध्ये असते


सगळ्यांच्या आवडीनिवडी जपत असते

त्यानुसार स्वयंपाक करत असते

हल्ली मी किचनमध्ये असते


काही भाजल्याच्या काही कापल्याच्या

कितीतरी खुणा पडत राहतात तरी

हल्ली मी किचनमध्ये असते


अंगाची काहिली होते गरमी मध्ये

घर्मबिंदू पंख्याखाली सुकवत असते तरी

हल्ली मी किचनमध्ये असते


काम करता करता अंधारी येते डोळ्यांसमोर

दोन मिनिटांच्या विश्रातीने जोमाने कामाला लागते

हल्ली मी किचनमध्ये असते


स्वयंपाक करा, जेवण वाढा, भांडी घासा

हीच काम पुन्हा पुन्हा करत असते

हल्ली मी किचनमध्ये असते


Rate this content
Log in