STORYMIRROR

Dattatraygir Gosavi

Others

3  

Dattatraygir Gosavi

Others

हळदी कुंकू

हळदी कुंकू

1 min
321

हळद कुंकूची जोडी

लावी लाडी लाडी गोडी

या बोटावर ही थोडी

त्या बोटावर ही थोडी

आदर सत्कार गोडी

सन्मान पुजेस जोडी।।धृ।।


हळकुंडा पोटी जन्म

हळदीस या सन्मान

लिंबू त्रुटीचे घोळन

एकजीव ते मिश्रण।

सूर्य देवाची ही गोडी

नेसे कुंकवाची साडी।।१।।


हळदी कुंकांचे नाते

जन्मोजन्मी चालते

नवदुर्गा भागवते

गोंधळ नि खलबते।

मळवट भरी लाडी

सगुण ललाटी जोडी।।२।।


पुजेला जय मल्हार

वाहू हळद भंडार

फळ फुलांचा एल्गार

नेसती द्वयी सिन्गार ।

लाल पिवळी ही मोडी

हळद कुंकूम जोडी।।३।।


किती घेतली व नावे

उखाणे नवीच्या नवी

किती गायील्या वं ओवी

अभंग म्हणीच्या म्हणी।

पती -पत्नीची ही गोडी

अखंड सौभाग्य जोडी।।४।।


निसर्गता गुणकारी

आयुर्वेदिक ही भारी

कृमी किटक ही मारी

सौंदर्यवती असे न्यारी।

हळद कुंकूची जोडी

हिंदू संस्कृतीची माडी।।५।।


Rate this content
Log in