हिवाळ्यातला सूर्य
हिवाळ्यातला सूर्य
1 min
139
हिवाळ्यातला सूर्योदय
हवा हवासा वाटतो
रात्रीचा नकोसा गारवा
थोडा सुसह्य होतो
हिवाळ्यात सूर्य
तेवढा प्रखर भासत नाही
उन्हात बसून मिळते ऊब
त्रास वाटत नाही
हिवाळ्यात सूर्यनमस्कार
गरजेचा असतो
अनेक विकारांपासून
आपला बचाव होतो
सूर्यापासून मिळते ऊर्जा
आपण कार्यरत राहतो
सूर्यास्त जवळ आला की
आपण काहीसे उदास होतो
हिवाळ्यात तर दिवस
लवकरच मावळतो
चांदोबा भेटतो लवकर
अन् सूर्य निरोप घेतो
प्रत्येक ऋतूचे
आपले गुणधर्म असतात
थोडं जुळवून घेतलं
की सुखदच वाटतात
