STORYMIRROR

Pradnya Sonali Dhamal

Others

4  

Pradnya Sonali Dhamal

Others

हितगुज

हितगुज

1 min
511

हितगुज सांग सखी तू शांत कशी

चेहरा तुझा उदास का डोळ्यांमध्ये लाली कशी


दुःख तुझे मज सांगशील का

नको लपवू वेदना तुझ्या सहन करून


गप्प का बसावे किती दिवस

तू झिजावे स्त्री जन्माला का शाप म्हणावे


चार भिंतीच्या आत जग तुझे

कुटुंबाचे कर्तव्य पार पडताना जबाबदारीचे डोक्यावर ओझे


तरी तू स्वतःला विसरू नको ना

आई वडिलांनी लाडात वाढवले किती मोठे स्वप्न होते जे तू पाहीले


डोळ्यात तुझ्या नव्हते कधी अश्रू आले

तेव्हाचे तेज ते आता कुठे हरविले


बोल तू माझ्याशी मन कर मोकळे डोळ्यातील आसवे ओघळु दे

माझा खांदा आधाराला घे


त्रास तुझा जरा मला कळू दे

नको समजू एकटी आहेस


सगळ्या मैत्रिणी तुझ्याच आहेत

व्यक्त करून बघ स्वतःला

प्रत्येकीची दुखणी सारखीच आहेत


Rate this content
Log in