हिरवी शाल
हिरवी शाल
1 min
477
वन उपवने बहरली
पांघरूनी शाल हिरवी
रम्य देखने दृश्य सारे
मन बावरे त्यात हरवी
समाधान लाभते
भुलते हिरवळीत
देव करो सदा
सुंदरता रहावी अबाधित
चिंता विसरुनी साऱ्या
देह होतो निवांत
मैत्री वाटते करावीशी
सुखावतो जीव तयाच्या सान्निध्यात
निसर्गाला माना मित्र आपुला
नाते जपा प्राणपणाने
कष्टी होईल मन जेव्हा
व्यक्त करावे मन मोकळेपणाने
