STORYMIRROR

Ramkrishna Nagargoje

Others

4  

Ramkrishna Nagargoje

Others

हिरा धरला ऐरणी.

हिरा धरला ऐरणी.

1 min
95

जी वाहिली पोटी,

जिच्या सोसल्या अटी,

प्रेम भरुन दिले ,

रिते माप नाही झाले,

ती कन्यादान झाली.


मंडपी झालर हालते,

ही वा-याची झुळुक,

काय सांगते,

या मंडपी,ही मंडळी,

अक्षदा हाती घेती,

शुभमंगल बोलती.

सावधान सारे.


पाऊल पडते पुढे,

सनई मंजुळ वाजे,

हे कन्यादान झाले,

मागे वळुन पाहे,

नेत्र भरले अवघे,

हे शुभमंगल झाले,

कन्यादान करुनी.


गंगा सिंधू नर्मदा,

कावेरी वाहती,

त्या सिंधुस मिळती,

हा वर श्रीपती.


कन्यादान झाले

कर सुखी सदन आपुले.

भवसागर भरला,

हा उत्सव विरला,

कन्यादान करुनी.


हे सुख संसाराचे देणे,

लाभोलाभ मिळो तुम्हा,

अखंड सुख लाभो,तुम्हा,

आज कन्यादान झाली,

रत्नखान अर्पण केली,

हिरा धरला ऐरणी,

पहा पैलू पाडूनी,

चमकतो कसा.



Rate this content
Log in