"हिंदुस्थान"
"हिंदुस्थान"
1 min
402
जिथे नांदती सर्व धर्म तो आहे हिंदुस्थान
जात-पाात ना मानूनी गातो आहे हिंदुस्थान
या धारेवर नवीन वसाया स्वर्ग पाहतो
प्रतीक तयांचे हा बनतो आहे हिंदुस्थान
या मातीमधूनी झरती असंख्य अशा गाथा
स्तवन तयांचे हा करतो आहे हिंदुस्थान
खुप संत आणि महंत पहा जन्मले
थोर कार्य डोळ््यानी पाहतो आहे हिदुस्थान
शांतीचा देऊनी संदेश जगात वावरतो
प्रगत वाटेवरी उडतो आहे हिंदुस्थान
या भूमीवर पुन्हा पुुन्हा जन्म घ्यावासा वाटेे
मरताना ही मनी उरतो आहे हिंदूस्तान!!!!!
