ही आणि ती
ही आणि ती

1 min

24
ती भिजते पावसात, अंतरातही भिजते
ही लाजत अंतरात पावसात ती बुजते
नजरेचे भिरभिरणे ते भिजणे थरथरणे
लाजूनिया अवघडणे गीत तिथे गुणगुणने
ते गुंजन, मन रंजन, मानसीच्या तिज कळते
वय अल्लड दोघींचे साजाविन सजण्याचे
मदन बाणांच्या जखमा काळजात जपण्याचे
ओलेती तिज पाहून, ही उरात हुळहुळते
थेंब कनक अलंकार, ती जपते अंगाव
शीश महल धाराचा भेदूनिया आरपार
ही घुसते मनमनात हिच्यातूनी ती फुलते