STORYMIRROR

AnjalI Butley

Others

3  

AnjalI Butley

Others

हिचे गणितच कच्चे

हिचे गणितच कच्चे

1 min
220

हिचे गणितच कच्चे

एक पोळी मागितली तर 

दोन पोळ्या वाढते

भूक लागली असेल म्हणून

आग्रहाने वाढते...


गोड काही मागितले तर

नावालाच देते

मधूमेह आहे म्हणून

काळजी घे म्हणते...


स्वतःला काही घ्यायचे म्हटले की

हलक्यात हलकी साडी निवडते

कोणाला द्यायची असल्यास 

भारी त भारी किंमतीची निवडते...


शेज्यारच्या काकू

अर्धा वाटी साखर मागता 

तर ही वाटी भरून

साखर देते...


माहिती असतं हिला चांगलं

साखर परत कधी मिळणार नाही

पण ही सतत दुसऱ्याला काहीतरी 

एक मागितले तर दोन देते...


असं का करते विचारले तर

तुला आत्ता नाही समजणार

शिकशील हळुहळु म्हणत

गालात हसते...


ती तिच्या गणितावर ठाम असते


पण मला सारखं वाटतं

एक मागितले तर दोन दे

दोन मागितले तर एक दे...

हे काय गणित आहे?


मला शाळेत शिकवलं गेलेल्या गणितात

एक अधिक एक म्हणजे दोन

एक वजा एक म्हणजे शून्य

पक्क बसलेलं असतं


म्हणून मला वाटतं

शाळेत न गेलेल्या

बाहेरच जग न पाहिलेल्या

हिचे गणितच कच्चे


तरी पण मला

कधी हिच्या सारखे

गणित कळणार

असा प्रश्न मात्र पडतो?


Rate this content
Log in