हेलकावा
हेलकावा
1 min
290
चाहूल लागता सुगीची, रंगली प्रीत वेडी
आला हेलकावा भावनेचा, कुणी हळूच केली खोडी
शिरला गारवा यौवनाचा, फाटला अंतरपाट मधीचा
रात्र तरूण झाली, झाकला तिने चंद्र नभीचा
आगमनास त्या प्रियेच्या, मदन सज्ज द्वारी
सळसळली नागीन वेगे, गेली स्पर्शून स्वारी
मालून दिवे द्विधेचे, जाहले एकरूप वारे
मिलनाचे निमित्त जाहले, पिकलेली जांभूळ बोरे
