STORYMIRROR

Somesh Kulkarni

Others

4  

Somesh Kulkarni

Others

हेच शल्य मनात राहील!

हेच शल्य मनात राहील!

1 min
464

उजाडलं खूप उशिरा जोपर्यंत काळोखानं आपलं साम्राज्य उभं केलं होतं

एका प्रेरणादायी प्रवासाचं तिकीट कुणीतरी मध्येच हिसकावून नेलं होतं

सगळ्या इच्छा-आकांक्षाचं मनावरचं ओझं डोळ्यांवाटे वाहून गेलं होतं

मनातलं अस्पष्ट भय समोर दत्त म्हणून उभं ठेलं होतं

आता क्षणोक्षणी मला माझंच मन खाईल

काहीच करु शकलो नाही हेच शल्य मनात राहील


ज्ञानाचा उजळला होता दिवा पुस्तकाशी घट्ट जमली मैत्री

जिंकणार मीच ही एकमेव होती खात्री

रातोरात बदललं विश्व परीक्षेच्या आदल्या रात्री

असहाय होतो बापासाठी अश्रू होते नेत्री

उचलून दवाखान्यात नेईपर्यंत तो वेदना कशा साहील?

काहीच करु शकलो नाही हेच शल्य मनात राहील


ज्या शिक्षणासाठी केले रात्रंदिवस कष्ट, विसरला सगळा स्वार्थ

होतं एकच होतं ध्येय शोधायचा मोठं होऊन जगण्याचा अर्थ

मनात होती धास्ती बापाचा वाढलेला आजार करील अनर्थ

नव्हता पैसा तेवढा आजही आठवते बापाची ती हाक आर्त

त्याच ज्ञानाचा उपयोग माझ्यासाठी नाही, दुसऱ्या कुणासाठी होईल

पण तेव्हा मात्र काहीच करु शकलो नाही हेच शल्य

कायम मनात राहील.


Rate this content
Log in