STORYMIRROR

Raakesh More

Others

4  

Raakesh More

Others

हे रोमँटिक काय घडतंय

हे रोमँटिक काय घडतंय

1 min
339

तुझ्या आठवणींच्या स्टॉकला 

हृदयाचं कपाट कमी पडतंय 

कळायला मार्ग नाही हे असं 

रोमँटिक आजकाल काय घडतंय ||0||


अचानक टिकटिक होते तुझी 

हृदयाच्या संवेदनशील दारावर 

अतिक्रमण करतेस क्षणार्धात 

माझ्या आवाक्यातील विचारांवर 

कळत नाही मला तुझ्यावाचून 

माझं असं का अडतंय 

कळायला मार्ग नाही हे असं 

रोमँटिक आजकाल काय घडतंय ||1||


अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतो 

तितका तुझ्या जवळ येतो 

तुला विसरण्याचा निश्चय करतो 

आणि तुझंच नाव मुखी घेतो 

मागे वळून पाहणार नाही असं 

ठरवलं की हृदय धडधडतंय 

कळायला मार्ग नाही हे असं 

रोमँटिक आजकाल काय घडतंय ||2||


सांगशील का तू सखे मला 

प्रेम असंच असतं का ? 

कितीही सांभाळलं तरीही इथे 

मन असंच फसतं का ? 

तुझंच वेड वेड्या मनाला 

टाळलं तरीही का जडतंय 

कळायला मार्ग नाही हे असं 

रोमँटिक आजकाल काय घडतंय ||3||


जरा मोकळा श्वास घेऊ दे 

खूप गुरफटंत चाललोय मी 

प्रियकराच्या सुखद अशा 

भूमिकेत वटंत चाललोय मी 

हृदय तुझ्याच आठवणीने आता 

प्रत्येक क्षणी तडफडतंय 

कळायला मार्ग नाही हे असं 

रोमँटिक आजकाल काय घडतंय ||4||


तुझी आठवण भविष्यातील 

स्वप्नात गुंफून पाहतो मी 

सतत तुझ्या विचारात का 

असा गुंतून राहतो मी 

शोधावं लागेल मला आता 

नक्की माझं कुठं नडतंय 

कळायला मार्ग नाही हे असं 

रोमँटिक आजकाल काय घडतंय ||5||


मन लागत नाही कुठे 

हुरहूर सतत जाणवणं 

विनाकारण फक्त तूझ्या 

आठवणीने डोळे पाणवणं 

हसण्याच्या प्रयत्नातही 

हृदय आतून का रडतंय 

कळायला मार्ग नाही हे असं 

रोमँटिक आजकाल काय घडतंय ||6||


वेड तर लागलं नाही ना 

लक्षणं तर तशीच आहेत 

लोकही आता विचित्र नजरेने 

मला आता बघताहेत 

मौन बाळगलं तरीही 

मन एकटंच बडबडतंय 

कळायला मार्ग नाही हे असं 

रोमँटिक आजकाल काय घडतंय ||7||


Rate this content
Log in