हे नाते मैत्रीचे
हे नाते मैत्रीचे
1 min
225
मैत्रीच्या ह्या धाग्यात
सगळेच गुंफत नाही
आयुष्याच्या या माळेत
मैत्रीचे स्थान बदलत नाही
दोस्ती च्या या वाटेवर
ऐरेगैरे भेटत नाही
मनातून आवाज देणारे
इतरत्र भोवती कुठेच नाही
मैत्री ही नित्य साठवावी
रीती कधीच होऊ नये
हे नाते मैत्रीचे स्वप्नातही
मी कधी हरवू नये
