हे गजानना
हे गजानना
शेंदूर लाल लावूनी
पिवळा पितांबर घालुनी
हातात लाडू मोदक
उंदीर तुझे वाहन असती
हे गजानन गौरी गणपती।
प्रथम नाव वक्रतुंड तुझे
दुसरे एकदंत ते
मस्तकी मुकुट सुंदर दिसे
नयन तुझे बोलके असती
हे गजानना गौरी गणपती।
तिसरे नाव कृष्णपिंगाक्ष तुझे
चौथे गजवक्र ते
आशिष देण्या हात वर असे
कर्ण सुपासारखे दिसती
हे गजानना गौरी गणपती।
पाचवे श्री लंबोदर
सहावे विकट नाव ते
दुर्वाची जुडी मस्तकी
हार गळा सुंदर
ढोल ताशांच्या गजरात विराजमान होशी
हे गजानना गौरी गणपती।
सातवे विघ्नराजेंद्र
आठवे धुम्रवदन ते
तूच आमचा सुखकर्ता
तूच आमचा दुःख हर्ता
दिंनदुबळ्यांचा नाथ तू
कार्याआरंभी सर्वजण पूजती।
हे गजानना गौरी गणपती।
नववे श्री भालचंद्र
दहावे श्री गजानन
सकलजनाचा तू त्राता
तूच संकट आमचे निवारीशी
हे गजानना गौरी गणपती।
अकरावे गणपती
बारावे श्री विनायक
देवनावे अशी बारा
तीन संध्या म्हणे नर
विघ्न भीती नसे त्याला
हे विघ्नहर्ता आम्हावरी
असू दे तुझी कृपादृष्टी
असू दे तुझी कृपादृष्टी
हे गजानना गौरी गणपती।
