STORYMIRROR

Murari Deshpande

Others

2  

Murari Deshpande

Others

हद्द

हद्द

1 min
117

पाणी जगवते पाणी मारते 

तोंडचे पळवते पाणी 

महाराष्ट्रातील महापूराने 

हेच सांगितले कानी 


सिमेंट काँक्रिटची जंगलं उभारत 

माणूस सुसाट सुटला 

अविचारी होऊन अखेर 

स्वतःच्याच जीवावर उठला 


नदीनाल्यांवर अतिक्रमणाची 

स्पर्धा नेहमीच नडते 

प्रवाहातील हस्तक्षेपाने 

मोठे विपरीत घडते 


अजूनही राखली पाहिजेत 

नद्यांची प्रशस्त पात्र 

नाहीतर भविष्यात वै-याचीच 

असेल प्रत्येक रात्र 


पाणी देतेच दाखवून 

त्याची हद्द अन ताकत 

निसर्ग कधी कोणापुढे 

मुळीच नसतो वाकत! 


धोक्याची घंटा वाजते आहे 

झोपेचे सोंग बरे नाही 

नद्या धोक्यात आणल्या तर 

माणसांचे काही खरे नाही 



Rate this content
Log in