हैदराबादी घाव
हैदराबादी घाव
1 min
431
जिथे जाळली भगिनी आमची
रात्रीच्या वेळी
त्याच ठिकाणी नराधमांच्या
रक्ताची होळी
देशच अवघा पोलिसांवर
करी पुष्पांची वृष्टी
जनता सारी या कृत्याची
करते आहे पुष्टी
एकही भगिनी भविष्यात ना
पडणे आता बळी
नराधमांच्या नरडीवरती
सदैव बंदूक नळी!
यांना कसले मानवाधिकार अन्
कसली माया दया
विकृत सारे ठेचून टाकू
अधिकार न जगण्या तया
हैदराबादी घाव खाकीचा
नराधमांना धडा
असेच 'सिंघम' जन्मा येवो
देश पाठीशी खडा
