STORYMIRROR

Mina Shelke

Others

4  

Mina Shelke

Others

हायकू

हायकू

1 min
27.4K



(१) गवत फुले

गोजीरवाणी मुले

नाजुक झुले


(२) कोवळ्या पानी

झुलती कर्णफुले

देखण्या रानी


(३) दिसते गोड

इवलीशी पाकळी

नाजुक खोड


(४) सुवास मंद

श्वासात परीमळ

हा दरवळ


(५) सुरेख नक्षी

बागडणारे पक्षी

निसर्ग कुशी


(६) फुलपाखरू

भिरभिरता पिंगा

करीतो दंगा


साहित्याला गुण द्या
लॉग इन