हातात हात
हातात हात
मी एक दिशा ठरवली होती
जगण्याची...
खूप कष्ट करून जात होते साथ घेऊनी
तुझ्या प्रेमाची
मनही खंबीर केले होते तमा न बाळगता
आगीची
तन ही बळकट झाले होते झळ सोसत
तापत्या सूर्याची
तुझी सात पण होती पण मनमानी
ही नशिबाची
दिली नाही नशिबाने साथ केलाच शेवटी
दुर्दैवी घात
किती-किती करू मी त्यावर
मात
सुटत होती माझ्या शरीराची
साथ
पण... तरीही होती ओझरती
आस...
जगण्याची.. ..अचानक प्रचंड इच्छाशक्ती
झाली जागृत
आणि मी केला मृत्यूचा एकवटुन
घात
कारण होता ना ग मम्मा तुझा माझ्या
हातात हात
दिसत होती तुझी ममता मला वाचवण्याची
तुझी क्षमता
धावपळ बघितली होती तुझी डॉक्टरांच्या
मागोमागची
निस्तेज झालेले तनमन बघत होते मी तुझी
वन-वन
स्पर्श दंशावर विजय मिळवून जागृत झाले हे
तन-मन
कारण होता ना ग मम्मा तुझा माझ्या
हातात हात
