हासरे फूले
हासरे फूले
1 min
179
धो धो पूर वाहतो ,कसा,
वरुन पाऊस पडतो,सारखा,
डोंगर हिरवा उंच दिसतो,
झाडीत पहा मोर नाचतो.
निळे गगण ढग,काळे,
गवत हिरवे,शिवार हिरवा,
मनी भरला,रानवारा.
नद्या वाहती जळ सारे,
जिकडे तिकडे पाणीच बरे,
पक्षी सोडती घरटे,सारे,
उंच आकाशी विहार बरे.
दुर दुर रंग दिसती,
कोणी उधळले,
पूर्व दिशेसी ?
सांग सांग उत्तर बरे,
आनंदाचे विश्व भरले,
रिते हात रिते गगण,
काम चाले पूढे पूढे.
विश्व भरले वनचरे,
उंच वृक्ष उंच तूरे,
लहान वेलींना,
हासरे फूले.
