हार-जीत
हार-जीत
1 min
58
शाळेत असताना
खेळ मैदानी खेळायचे
जिंकायचे हे मनी मात्र
कायमस्वरूपी असायचे...
हळूहळू मोठे होता होता
समजले हार-जीत असतेच
जीवन आहे, हे चालू राहतेच
आपण सारे हे पचवायचे...
हार झाल्यावर हार मानायची नाही
जीत झाली असता हुरळायचे नाही
जीवनरूपी नौका पार करताना
समजून उमजून वागणे सारे काही...
हार झाली असता जीत का नाही झाली
याचा समर्पक विचार आपण करावा
आचार नीट ठेवून सर्वांशीच मग
न चिडीचा योग्य डाव सदा खेळावा...