हा सागरी किनारा
हा सागरी किनारा
1 min
11.9K
हा सागरी किनारा
भारी खट्याळ वारा
झोंबतो कसा हा
येई अंगावरी शहारा
एकांती सागरकिनारी
मध मनाशीच बोले
नसते कुणी ही साथी
मन हितगुज खोले
नीळव ती शांतता
रात्रीसमयास जाता
हरपते भान सारे
ऐकून आवाज तो लाटांचा
उंच उंच झाडी
बघुनिया सांजवेळी
मनपाखरू सुखावे
सूर्य मावळतेवेळी
