STORYMIRROR

Rutuja kulkarni

Others

3  

Rutuja kulkarni

Others

हा पाऊस

हा पाऊस

1 min
229

सळसळत्या पानांवरून, 

ओघळतो हा थेंब नवा. 

सरसर करीतं आज पुन्हा, 

बरसतो हा पाऊस नभातं. 


गडं गडं करीतं पुन्हा, 

गर्जना ही सुरू होते. 

कडकड करीतं विजांची, 

बडंबडं सुरू होते. 


धरतीवरून पुन्हा नवे, 

झरे आज वाहू लागतात. 

टिप टिप करीतं , 

धारा गाऊ लागतातं. 


किलबिलणाऱ्या पाखरांनी, 

आसमंत असा बहरून येतो. 

धुंद या पावसाने, 

जीव अल्लड होतो.... 


Rate this content
Log in