हा पाऊस...
हा पाऊस...
1 min
92
सुखावणारा हा पहिला पाऊस
मला नित्य वेगळा भासतो
मनात साठलेल्या आठवणींना
हळूच ओले मग करतो
हवाहवासा वाटणारा हा पाऊस
नेहमीच आनंदाचे क्षण घेऊन येतो
धावपळीच्या जीवनात ही पुन्हा
बालपणाचे सुखद क्षण देऊन जातो...
