STORYMIRROR

Sneha Bawankar

Others

3  

Sneha Bawankar

Others

हा धन्यवाद त्यांच्यासाठी.....!

हा धन्यवाद त्यांच्यासाठी.....!

1 min
233

आश्वासनाची लाट घेऊन , कठोर शब्दांनी मला कळवले,

हा धन्यवाद त्यांच्यासाठी ज्यांनी मला घडवले.

विश्वासाचे ज्ञान असूनही ,अविश्वासू मला ठरवले,

हा धन्यवाद त्यांच्यासाठी ज्यांनी मला घडवले.

आवळी-निवळीचा विचार नसूनही, मनातील विचार कळवले,

हा धन्यवाद त्यांच्यासाठी ज्यांनी मला घडवले.

इंद्र धनुंशाचे रंग नसूनही,रंगांच्या शब्दांनी मला मळवले,

हा धन्यवाद त्यांच्यासाठी ज्यांनी मला घळवले.

नकारात्मक कृत्य माझे असे म्हणून मला रळवले,

हा धन्यवाद त्यांच्यासाठी ज्यांनी मला घडवले.

चारित्र्यहीन म्हणून मला कृतज्ञतात्मक बनवले,

हा धन्यवाद त्यांच्यासाठी ज्यांनी मला घडवले.

उपदेशाचे ज्ञान नसूनही उपहासांशी लढवले,

ज्यांना माझे शब्द कळेनासे वाटत,बघा त्यांनीच मला घडवले.

चेहऱ्याने सुंदर नाही, तर माझ्या विचारांनी मला सुंदर बनवले,

हा धन्यवाद त्यांच्यासाठी ज्यांनी मला घडवले.

उपदेशाचे रंग मी माझ्या लेखणीतून कळवले,

हा धन्यवाद त्यांच्यासाठी ज्यांनी मला घडवले.

Rate this content
Log in