गवळी समाज !!
गवळी समाज !!
मी या समाजाचा
मी ह्या मातीचा
आपल्यातूनी एक
गवळी समाजाचा !! धृ !!
अभिमान तर आहेच
कौतुकही वाटते
तुमच्यातील हे प्रेम पाहून
इथे येण्याचे सार्थक वाटते !! १!!
नाही हो मी कोणी नाही
आपल्यातील एक आहे
तुमच्या ह्या प्रेमापोटी
आदराचे दोन वाक्य आहेत !! २ !!
प्रयत्न हे केलेच पाहिजे
ते तुम्ही सगळे करत आहात
भव्य दिव्य ह्या सोहळ्याचे
हे एक उदाहरण आहे !! ३ !!
नेहमी लक्षात ठेवा……
आज तुम्ही थांबलात
तर तो तुमचा शेवट नाही
पुन्हा नव्याने उभा रहा
त्यात तुमचा अंत नाही !! ४ !!
चुकले तर राहूदे
कार्य पुन्हा करता येईल
पण चुकीसाठी बिथरलात
तर सुरवातीस थांबाल !! ५ !!
विश्वास हा स्वतःवर ठेवा
सर्व काही सोपे आहे
लिहायला सेकंद पण
जीवनात मूल्य अनमोल आहे !! ६ !!
परिपूर्ण हा समाज आपला
असाच वेगाने पुढे नेऊ
एकसंघ , एकनिष्ठ , एकत्र
आज नव्याने सुरवात करू !! ८ !!
आज नव्याने सुरवात करू !! ८ !!
