गुरुवार..कोरा..!
गुरुवार..कोरा..!
1 min
291
को ण म्हणते हरणे बरे नसते
रा ग लोभ मद मत्सर गेल्यावर
गु रगुरणे फुरफुरणे जेंव्हा संपते
रु सणे फुगणे तेंव्हा आपोआप विरते....!
वा टते कधी कधी
र डावे मनसोक्त आणि
ध डपडावे कडमडावे
ड मरू घेऊन तांडव ही करावे....
प ण जाण अंतरात होता
डी वचलेले डंख आठवतात
चा वे सुद्धा डोके वर काढतात
अ स्तनीतले सापही गरळ ओकतात....
नु सते सोपस्कार सारे
भ लतेच नको तितुके भोवतात
वा टते आता बस झाले
चा लता चालता चालून पाय थकले...
झाले गेले गंगेला मिळाले
पुन्हा सूर जुळून आले
पाण्याला पाणी, मनाला मन मिळता
सारे क्षणात एकरूप आपसूक झाले....!
