STORYMIRROR

Savita Kale

Others

4  

Savita Kale

Others

गुरूजींचे महत्त्व

गुरूजींचे महत्त्व

1 min
613

मातीचा लहानसा गोळा होते

सुंदर आकार दिला तुम्ही

निस्तेज अशा ता-यांना

स्वतः चा प्रकाश दिला तुम्ही।। १।।


हाताला धरून अक्षरे

गिरवायला शिकवले तुम्ही

पंख होते कमजोर

उडायला बळ दिले तुम्ही।। २।।


कधी रागीट नजर

कधी प्रेमळ स्वर

कधी शाबासकीची थाप

पाठीवर दिली तुम्ही।। ३।।


अज्ञानाचा अंधकार

दाटला होता घनघोर

मार्ग नव्हता सापडत तेव्हा

दिशा दाखवली तुम्ही।। ४।।


ओळखत नव्हते स्वतः ला

मला ओळखले तुम्ही

संकटांना सामोरे जाण्यचे

धाडस दिले तुम्ही।। ५।।


स्पर्धेचा सागर होता

स्पर्धक अमाप होते

बुडण्याची भिती मनात

पोहायला शिकवले तुम्ही।। ६।।


स्वाभिमान जागवून

जगायला शिकवले

माणसाशी माणसासम

वागायला शिकवले।। ७।।


शिकवलेल्या गोष्टींतून

आजही दिसता तुम्ही

तुम्ही नसता गुरूजी तर

घडलोच नसतो आम्ही।। ८।।



Rate this content
Log in