गुरूगीत
गुरूगीत
1 min
266
तू गुरू माऊली
ज्ञानाचा सागर
सदगुण खाण
वात्सल्य आगार.....
सत्य तेच ठाव
तेजोमय वाट
गुरू अंतराचा
दिव्यत्वाची लाट....
सकला आधार
मांगल्याची मूर्ती
गुरूजी आपली
विश्वात्मक कीर्ति.....
साक्षात दैव तू
गुणवत्ता खास
समाज विकास
हीच तव आस....
चिमुकल्यांचा तू
माय बाप आहे
शिकवी तयांना
त्यांचे हीत पाहे.....
गुणवत्ता ध्यास
उपक्रम खाण
राबवी सतत
गुरूंना हो मान.....
