गुरूचे महत्व
गुरूचे महत्व
1 min
275
आषाढाच्या पौर्णिमेला
साजरी होते गुरूपौर्णिमा
गुरूंनी दिलेल्या अगाध ज्ञानाला
व्यक्त करु कृतज्ञता चला
संस्कारांचा भंडार गुरू हा
अंधकाराचा नाश करतो हा
जन्म - मृत्यूच्या चक्रातून सोडवतो
परब्रह्माशी मिलन घडवतो हा
मान ठेवूया निस्वार्थपणाचा
जीवन घडवणाऱ्या शिक्षकांचा
मूल्ये शिकवणाऱ्या पालकांचा
मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरुंचा
गुरूकृपेनीच होते गुरू प्राप्ती
शिष्याच्या जीवनात येते संतृप्ति
अशा या गुरूचे महत्व जाणूया
नम्रतेने तया चरणी वंदन करूया
